February 21, 2026


पाथर्डी | प्रतिनिधी
पाथर्डी आगाराच्या वतीने भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही विशेष बस सेवा दिनांक ६ फेब्रुवारी रोजी पाथर्डी आगारातून रवाना होणार असून, गणेशभक्तांना अष्टविनायकाचे दर्शन घडवून आणण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या यात्रेसाठी तिकीट दर निश्चित करण्यात आले असून महिलांसाठी ७६० रुपये तर पुरुषांसाठी १५२० रुपये इतका दर ठेवण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत असून सध्या सदर गाडीत फक्त २० जागा शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे इच्छुक भाविकांनी विलंब न करता आपली नोंदणी करून तिकीट बुकिंग करावे, असे आवाहन पाथर्डी आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यात्रेबाबत अधिक माहिती तसेच तिकीट बुकिंगसाठी पाथर्डी आगाराचे वाहतूक नियंत्रक कारखेले साहेब यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९७६३६७५०४७ असा आहे. अष्टविनायक दर्शनासाठी ही सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आगार प्रशासनाने सांगितले आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!