April 14, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पाथर्डी शहरासह तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पाथर्डी पंचायत समितीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीने शहरात भव्य रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला. नाईक चौक, अजंठा चौक, पेठ, आंबेडकर चौक या मार्गांवरून रॅली काढत आंबेडकर भवन येथे सांगता करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक, बँड व भीम गीतांनी वातावरण उत्साही झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले.
रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे शहरातील वस्तीगृहांतील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. हातात फलक घेऊन त्यांनी बाबासाहेबांचे विचार मांडले. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे उत्सवाला अधिक रंगत आली.
आंबेडकर भवन येथे सर्वपक्षीय नेते, मान्यवर व भीमसैनिकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला. मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करत मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.
या वेळी आमदार मोनिका राजळे, प्रताप ढाकणे, किसन चव्हाण,प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, नगराध्यक्ष अभय आव्हाड,उपनगराध्येक्ष मंगल कोकाटे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक,नगरसेविका व भीमसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती उत्साहात व शांततेत पार पडत आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही उपक्रमातून समाजाला सकारात्मक संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमात सुरेशराव भागवत, रवींद्र आरोळे, लाभान पगारे, नाना पगारे, लक्ष्मण काळोखे, भाऊसाहेब बर्फे, वाल्मीक नरोडे, महेश अंगारकी, रवी पगारे, विकी पगारे, इंद्रजीत शिंदे, प्रसाद बर्फ, संतोष इंगवले, संतोष उदमले, महेंद्र राजगुरू आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या जयंती उत्सवातून समता, न्याय व बंधुभावाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याचे चित्र दिसून आले.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!