April 14, 2026

पाथर्डी : येथील पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून तसेच काही प्रकरणांमध्ये अनेक वर्षांपासून गुन्हे, अपघात किंवा बेवारस स्थितीत सापडलेली दुचाकी, तिनचाकी आणि चारचाकी वाहने पडून आहेत.

या वाहनांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने संबंधित वाहनधारकांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.यासंदर्भात पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे की, संबंधित वाहनमालकांनी येत्या आठ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली वाहने पोलीस ठाण्यातून ताब्यात घ्यावीत. यापूर्वीही अनेक वेळा वाहनमालकांना सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अद्याप अनेकांनी आपली वाहने नेलेली नाहीत.जर निर्धारित मुदतीत वाहनधारकांनी प्रतिसाद दिला नाही, तर संबंधित वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे सर्व वाहनमालकांनी वेळेत पुढाकार घेऊन आपली वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

🚨 Breaking असो किंवा Special — तुमच्याकडची बातमी सर्वात आधी आमच्याकडे!

📲 WhatsApp करा : 8605255255 / 9421555567
🔥 “आवाज जनतेचा… आता थेट तुमच्याकडून!”

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!