April 18, 2026

पाथर्डी : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून, पाथर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहाच्या नव्या इमारतीसाठी तब्बल 12.69 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.


समाजकल्याण आयुक्तालयामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला अखेर 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये अत्याधुनिक सुविधा असलेली तीन मजली इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन, नाश्ता आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सध्या असलेले वस्तीगृह अपुरे पडत असल्याने नवीन व सुसज्ज इमारतीची गरज निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2025 मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता या निर्णयामुळे पाथर्डी तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित निवासाची सुविधा मिळणार असून, त्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळणार आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!