February 21, 2026

पाथर्डी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. जगदीश मुने यांनी आपल्या प्रभागातील विविध भागांची पाहणी करून विकासकामांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे.

निवडणुकीत जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. जगदीश मुने यांनी तातडीने कामाला सुरुवात केल्याचे यावेळी स्पष्ट झाले. याच अनुषंगाने पाथर्डी शहराचे ग्रामदैवत असलेल्या रामगिरी बाबा टेकडी येथे त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या.
रामगिरी बाबा मंदिराची सद्यस्थिती पाहून या मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव त्यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. मंदिरासह संपूर्ण टेकडी परिसराचा सविस्तर विकास आराखडा तयार करून धार्मिक, सामाजिक व पर्यटनदृष्ट्या या पवित्र स्थळाचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छतेत सुधारणा करणे, प्रकाशव्यवस्था बळकट करणे तसेच सुरक्षित दर्शनमार्ग तयार करणे या बाबींवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर केवळ कार्यालयात बसून काम न करता थेट नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा निर्णय नगरसेवक डॉ. मुने यांनी घेतला आहे.
“विकासकामे निश्चितच होतील; मात्र जनतेने दिलेल्या विजयाच्या कौलाचे ऋण फेडण्यासाठी मी स्वतः घरोघरी जाऊन नागरिकांच्या अडचणी ऐकत आहे. लोकांच्या समस्या समजून घेतल्याशिवाय खरा विकास शक्य नाही,” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

गेल्या दोन-तीन दिवसांत रामगिरी बाबा टेकडी परिसर, हरिजन वस्ती तसेच संपूर्ण प्रभागात त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, गटार व्यवस्था, पथदिवे, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांची पाहणी केली. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी आवश्यक त्या सुसज्ज सुविधांसाठी प्राथमिक विकास आराखडा तयार केला असून, समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे.विशेष म्हणजे, स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायाकडे वेळ न देता सकाळपासूनच ते नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या व अडचणी ऐकून घेत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कामाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिकांनी “नगरसेवक थेट आमच्यापर्यंत पोहोचत आहेत,” अशा शब्दांत समाधान व्यक्त केले आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!