February 21, 2026

पाथर्डी – तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि जालिंदरनाथ माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सुभाष भागवत यांची राज्य वाहतूक सुरक्षा दल, नागरी संरक्षण संघटन, राज्य गृह विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत ‘रोड सेफ्टी पेट्रोल’ आणि ‘सेल्फ डिफेन्स’ संस्थेच्या तालुका उपसमादेशकपदी निवड झाली आहे.

या वेळी नाशिक विभागाचे समादेशक सिकंदर शेख, जिल्हा पोलीस मुख्यालयाचे उमेश परदेशी, जिल्हा समादेशक प्रकाश मिंड तसेच जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मैदानावर वाहतुकीचे प्रशिक्षण देण्यात आले. अपघातांची कारणे, वाहतुकीचे नियम, जबाबदार नागरिक म्हणून वर्तन आणि अपघातग्रस्तांना प्रथमोपचार कसे द्यावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.आपल्या भाषणात सिकंदर शेख म्हणाले, “सेवासासाठी जीवन” या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करण्याचे सामर्थ्य या उपक्रमातून वाढते. वाहतूक नियंत्रण, पद कवायत, अग्निशमन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार आणि आकस्मिक सेवांचे प्रशिक्षण देण्यात येत असून, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना हे शिक्षण मोफत दिले जाते. सुरक्षित आणि सुदृढ नागरिक घडविण्याच्या उद्देशाने हे सेवेकेंद्रित कार्य विनामूल्य सुरू आहे. प्रत्येक सेवकाने या जबाबदारीत प्रामाणिकपणे, सेवाभावाने आणि शिस्तीने सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.या निवडीबद्दल एकता फाउंडेशन, वामनभाऊ नगर तरुण मित्र मंडळ आणि शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी सुभाष भागवत यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांची निवड केवळ अभिमानास्पदच नाही, तर तालुक्यातील सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला नवी दिशा देणारी ठरली आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!