प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी : सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत जिल्हा क्रीडा विभाग, अहिल्यानगर व बाबूजी आव्हाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय अंतरमहाविद्यालयीन तसेच ज्युनिअर, युवा गटांकरिता वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी कुबेर संतोष जिरेसाळ याने ज्युनिअर गटातील ५५ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला व सुवर्णपदकावर नाव कोरले. याचबरोबर युवा गटातील पुढील वजन गटातही त्याने दमदार खेळ करत तृतीय क्रमांक मिळवला आणि रौप्य पदकावर आपली छाप उमटवली.कुबेरने आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य शरद मेढे सर, क्रीडा शिक्षक रावसाहेब मोरकर सर तसेच जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सचिव विजय देशमुख यांना दिले. योग्य मार्गदर्शन व खेळातील बारकावे शिकवल्यामुळे हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले.

कुबेरच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक प्रसाद आव्हाड, संपत घारे, माऊली गायके, सतीश डोळे, तुषार शिंदे, सतीश बोरुडे, श्रीमती बोराडे तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, प्रकाश महाजन व कमलाकर आव्हाड यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.
