February 21, 2026

शेवगाव-पाथर्डी मार्गावरील डांगेवाडी शिवारात झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली.

या अपघातात दुचाकीस्वार यादव विश्वनाथ वाघमारे (वय 60, रा. फलकेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, मारुती अल्टो कार (MH 14 CC 7379) ही शेवगावकडून पाथर्डीकडे भरधाव वेगात येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून नियमीतपणे येणाऱ्या एक्टिव्हा दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की वाघमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या अपघातात दुचाकी व कार दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या भीषण घटनेमुळे काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला.

अपघातामुळे डांगेवाडी परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. मृत वाघमारे हे शांत स्वभावाचे, कष्टाळू आणि सर्वांना आपुलकीने वागणारे म्हणून परिचित होते. त्यांच्या अकस्मात निधनाने फलकेवाडी व डांगेवाडी गावात दुःखाचे सावट पसरले आहे.दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्टो कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!