नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असून राहुरी परिसरात आठवडाभरात ४ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

संतप्त झालेल्या कृती समितीने १० सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले. नगर ते कोपरगाव मार्गाचे पूर्ण डांबरीकरण करून पेव्हमेंट स्वरूपात तयार करणे,देवळाली नगरपरिषद हद्दीतील साईड गटार भूमिगत करणे, भविष्यातील सर्व्हिस रोड लक्षात घेऊन सध्याचे भूमिगत ट्रेनिंगचे नियोजन करावे, सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची माहिती फ्लेक्स बोर्डवर जनतेसाठी जाहीर करणे,रस्ता डांबरीकरण न झाल्यास जड वाहतुकीस बंदी घालून पर्यायी मार्गाने वळविणे आदिंसह विविध मागण्या करण्यात आल्या आहे.

यावेळी कृती समितीचे वसंत कदम,अनिल येवले, देवेंद्र लांबे प्रशांत मुसमाडे, आदिनाथ कराळे,बाळासाहेब लोखंडे, ,दत्ता गागरे,प्रशांत काळे, कांता तनपुरे, प्रतीक तनपुरे, गजानन सातभाई, अनिल कासार, प्रकाश पारख, सतिष घुले, विजय तमनर, दत्ता गागरे, कैलास वाघमारे, रमाकांत खडके, राजेंद्र लांडगे, निखिल गोपाळे, गणेश खैरे, अरुण साळवे, सोमनाथ गीते, सुनील पानसंबळ, ज्ञानदेव निमसे, रविंद्र नालकर, विकास साळुंके, आप्पासाहेब मोकळ, निलेश मुंढे, संजय नलावडे, राजेंद्र लोखंडे, सतीश बोरुडे,रमाकांत गीते, विशाल वने,नसीब पठाण, जगू वरखडे, अनिल वाणी, प्रितेश तनपुरे, सचिन चौधरी,विजय भिंगारे आदिंसह नागरिक उपस्थित होते.
