पाथर्डी_शहरात व तालुक्यात यावर्षी डीजे मुक्त गणेशोत्सव, स्थापना मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक शांततेत व वेळेच्या अगोदर पार पडली, हीच सर्वात मोठी यशस्वीता असल्याचे मत पो.नि. विलास पुजारी यांनी स्पष्ट केले.

प्रतिनिधी_सचिन दिनकर
त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून वेळेवर आणि सुरळीत विसर्जन होण्यास याचा मोठा हातभार लागला.शहरातील मानाचा गणपती असलेल्या विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने पोलीस प्रशासनाचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक पुजारी यांचा सत्कार करताना मंडळाचे अध्यक्ष विनोद चन्ने आणि इतर पदाधिकारी संतोष चन्ने, संतोष शिरसाठ, शिवा परदेशी, शिवम चन्ने, योगेश चन्ने, शुभम सोलस्कर, रमेश चन्ने, संजय गिरी, मनोज चन्ने उपस्थित होते. नागरिकांनी या निर्णयाचे मनापासून कौतुक केले . पुढे बोलताना पुजारी यांनी डीजेमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा फटका बालक, वयोवृद्ध, रुग्ण, विद्यार्थी आणि महिलांना बसतो यावर भर दिला.
ध्वनी प्रदूषणामुळे हृदयविकार, मृत्यू आणि इतर आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढते, तसेच वादविवाद आणि अपघातांचे प्रमाणही वाढते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. लेझर लाईटवर बंदी घालण्यात आल्याने देखील सर्व नागरिक, व्यापारी आणि भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.शहरातील मागील काही वर्षांतील दुर्घटना लक्षात घेता यावर्षी डीजे मुक्तीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्याला नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पुजारी यांनी आगामी काळातही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तसेच येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवात श्री.क्षेत्र मोहटादेवी येथे येणाऱ्या भाविकांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी डीजे मुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीचे केले कौतुक शांतता, आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या या मोहिमेचे शहरभर कौतुक होत असून डीजे मुक्त गणेशोत्सव हा सामूहिक जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरला आहे.
