प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी- तालुक्यातील तिसगाव येथे घडलेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करणारे अकील नजौर पठाण (वय 37) यांनी या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास तसेच 18 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान, आरोपींनी एकत्र येऊन वर्क्स वेल्डिंग दुकानासमोर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला. या प्रकरणी तौसिफ शेख उर्फ नेपाळी, अरबाज हसन पठाण, मझहर मुनोवात पठाण, शकील हसन पठाण, आणि जाहीर जावेद पठाण जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,या आरोपींना अजूनही अटक झालेली नसल्यामुळे फिर्यादी अकील पठाण यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास पुजारी यांची भेट घेत न्याय मिळावा अशी मागणी केली. त्यांनी चेतावणी दिली की, आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास आणि गुन्हा कलम 307 अंतर्गत दाखल न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.पोलिस निरीक्षक पुजारी यांनी मात्र आश्वासन दिले की या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांमध्ये संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे.या वेळी नूरझा महम्मद शेख, रुकसाना रशीद शेख, खातूनबी नजीर पठाण, शाहिस्ता अकील पठाण, अरेफा राजू शेख, अर्शद महंमद शेख, आबेद महंमद शेख, शाहिदा नदीम पठाण, सलीम नजीर पठाण, आणि वाहेद रशीद शेख उपस्थित होते.
