February 21, 2026

पाथर्डी -समाजातील *दुबळे, वंचित आणि निराधार बालक* हे आपल्या काळजी व प्रेमाची वाट पाहत असतात. अशा बालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलवणे ही प्रत्येक *सुजाण नागरिकाची सामाजिक जबाबदारी* असल्याचे मत **सामाजिक कार्यकर्ते सतीश मासाळकर* यांनी व्यक्त केले.

*स्वर्गीय भीमराज पवार* यांच्या स्मरणार्थ आणि *तानाजी भाऊ जाधव* यांच्या वाढदिवसानिमित्त *मोहरी रस्त्यावरील मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी सण साजरा* करून सतीश भाऊंनी एक *आदर्शवत उपक्रम* राबवला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर आणत त्यांच्या तोंडात गोडीचा घास घालणे हेच *ईश्वरी सेवेसम* असल्याचे त्यांनी नमूद केले.

सतीश भाऊ म्हणाले, “ *माणसाची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.* मूक, अंध, अपंग या बांधवांच्या माध्यमातूनच *देवत्वाचा अनुभव* घेता येतो. दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर कुटुंब, नातेसंबंध किंवा मित्रपरिवाराऐवजी या विद्यार्थ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांसोबत सण साजरा करताना मला खऱ्या अर्थाने *ईश्वरी आनंद* लाभला.”

या वेळी *संजू भाऊ मोहिते, सागर भाऊ पवार, गोविंद शेठ गरजे, राहुल पालवे, आकाश डुकरे, भरत साठे, बाळूमामा साळकर, राम मासाळकर, काळू मासाळकर, आकाश फुंदे, प्रवीण पवार, बाळू पवार, भागवत विघ्ने* आदी कार्यकर्त्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे *मुख्याध्यापक सचिन तरवडे*, *प्रताप निराळी*, **भारत बर्डे* तसेच *विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित**होते.
या *मानवतेच्या दिवाळी उपक्रमाचे शहरातून उत्स्फूर्त स्वागत* होत असून, संस्थेतर्फे समाजातील *दाते आणि सेवाभावी व्यक्तींना* या विद्यार्थ्यांच्या *सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावण्याचे आवाहन* करण्यात आले आहे.
**सतीश मासाळकर** यांच्या या उपक्रमाने “ *सेवा हीच साधना, आणि माणुसकीचं खरं तेज म्हणजेच दिवाळीचा दीप* ” हे संदेश पुन्हा एकदा उजळवले आहेत

कार्यक्रमाचे *प्रास्ताविक अतुल धुमाळ*, *सूत्रसंचालन गौरव खताळ*, तर *आभार प्रदर्शन अतुल ससे* यांनी केले.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!