प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी | भारतीय संस्कृतीतील दीपोत्सवाचा प्रारंभ आरोग्याच्या अधिष्ठात्री देवता भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने होत असतो. धनसंपत्तीइतकंच नाही तर त्याहूनही अधिक मोलाचं स्थान आरोग्याला आहे.

याच भावनेतून आरोग्यसेवकांचा सन्मान करण्याचा प्रेरणादायी उपक्रम लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान,धन्वंतरी योग व फर्टिलिटी सेंटर आणि पाथर्डी तालुका निमा संघटनेतर्फे हाती घेण्यात आला.या प्रसंगी झालेल्या धन्वंतरी पूजन व सन्मान सोहळ्यात खरवंडी येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. आश्रुबा जायभाये, तसेच तिसगाव येथील डॉ. बाळकृष्ण मरकड आणि डॉ. सुनीता मरकड यांना “धन्वंतरी पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. अविनाश दराडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात रेवा देशमुख हिच्या सुंदर गणेश वंदनेने झाली.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान धन्वंतरींचे पूजन आणि दीपप्रज्वलन पार पडले. यावेळी पूजनाचे पौरोहित्य वेदमूर्ती हरी आणि ओम देवा कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.श्रीधर देशमुख यांनी प्रास्ताविक करून उपक्रमामागील प्रेरणा आणि उद्दिष्टे स्पष्ट केली.डॉ. ज्योती देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर प्रणव देशमुख आणि गार्गी देशमुख यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले.डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विलास बाहेती होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, संदीप शेवाळे, डॉ. अभय व डॉ. सोनाली भंडारी, डॉ.अभय आव्हाड, डॉ.योगिराज देशमुख, डॉ.सुरेखा लोखंडे, डॉ. विद्या दराडे, डॉ. अमोल कोतकर, डॉ. प्रमोद सुपेकर, डॉ. वैभव नागरे,डॉ.राहुल वेलदे, तसेच चैतन्य उद्योग समूहाचे अनंत ढोले पा, बंडोबा आंधळे, रविदेवा कुलकर्णी आणि आनंद मर्दाने आदी मान्यवर उपस्थित होते.आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाज uplift करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान करताना कार्यक्रमस्थळी भावनिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.धन्वंतरी पूजनाच्या निमित्ताने पाथर्डीत आरोग्य, संस्कार आणि कृतज्ञतेचा संगम अनुभवायला मिळाला.
