February 20, 2026

पाथर्डी – तालुक्यातील करोडी गावातील प्राचीन शनिमारुती अर्थात काळा मारुती मंदिरात चोरट्यांनी हात साफ करत भाविकांच्या श्रद्धेवरच डल्ला मारला आहे.

लोखंडी दानपेटी फोडून त्यातील अंदाजे साडेतीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.पुजारी शिवाजी ज्ञानदेव दहिफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी नियमित पूजेनंतर दानपेटी सुस्थितीत होती. मात्र रविवारी सकाळी दर्शनासाठी आलेल्या नवनाथ बेळगे आणि म्हतारदेव गोल्हार यांच्या नजरेस दानपेटी फोडलेली दिसताच त्यांनी तत्काळ पुजारींना खबर दिली. दहिफळे मंदिरात पोहोचले असता दानपेटी उघडून रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!