February 20, 2026

प्रतिनिधी – सचिन दिनकर

पाथर्डी तालुक्यातील धामणगाव परिसरात आज रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

अशातच मढी येथील दोन तरुण विको गाडीसह प्रवाह ओलांडत असताना अचानक आलेल्या पुराच्या प्रचंड लाटांमध्ये अडकले आणि गाडी तब्बल एक किलोमीटर पाण्याबरोबर वाहत गेली. भीषण पाण्याच्या तडाख्यात दोघांचा जीव धोक्यात सापडला होता.

सुदैवाने गाडी पुढे एका मोठ्या झाडाला अडकली, मात्र आत अडकलेल्या तरुणांचा जीव संकटात होता. या जीवघेण्या प्रसंगाची बातमी कळताच गावातील तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता जीवाची पर्वा न करता पुराच्या लोंढ्यात उडी घेतली. पाण्याचा प्रचंड जोर असूनही हातात दोरी घेऊन आणि एकमेकांचा आधार घेत या शूरवीरांनी अडकलेल्या दोन्ही तरुणांपर्यंत पोहोचत त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

या तरुणांच्या धैर्य, तत्परता आणि एकजुटीमुळे एक भीषण दुर्घटना टळली असून त्यांच्या या शौर्यकृत्याचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!