February 21, 2026

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील धार्मिक देवस्थानात घडली असून, शेकडो भाविकांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. आजच्या विज्ञानयुगात श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाला अधोरेखित करणारी अविस्मरणीय घटना

या प्रसंगामुळे उपस्थित भक्तांच्या ईश्वरावरील श्रद्धेला अधिक बळकटी मिळाली आहे. गुरुवारी देवस्थानात धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसाद सुरू असताना अचानक तीन-चार वानर प्रकट झाली. अनेकांनी त्यांना महाप्रसाद देऊ केला, मात्र कुठल्याही वानराने तो स्वीकारला नाही. यावेळी देवस्थानाच्या बंदोबस्तावर असलेले अहिल्यानगर पोलीस दलातील संतोष काकडे यांनी आपल्या हातातील शेंगदाणे वानराला देऊ केले. ते पाहताच वानराने विश्वासाने त्यांच्याकडे झेप घेतली व शांतपणे शेजारी बसून त्यांच्या हातानेच शेंगदाणे खाल्ले.

सर्व शेंगदाणे संपल्यावर काकडे यांनी त्या वानराला मारुतीराया समजून नम्रतेने दर्शन घेतले व परत जाण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यांच्या शब्दांना प्रतिसाद देत वानर तेथून निघून गेले. या अद्भुत प्रसंगाने उपस्थित भाविकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि भक्तीचा अनोखा अनुभव मिळाला.

बातमी शियर करा

1 thought on “पोलिस कर्मचाऱ्याच्या हातून वानराने घेतले शेंगदाणे, भाविक थक्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!