February 21, 2026

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात राहणारी ही अल्पवयीन मुलगी आईच्या निधनानंतर तिच्या मामाकडे राहत होती.

दिनांक ११ जून २०२५ रोजी तिच्या मामाने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. घटनेच्या दिवशी तिचा मामा, मामी आणि इतर कुटुंबीय मासेमारीसाठी नदीकडे गेले असताना मुलगी घरी एकटी होती. याच संधीचा गैरफायदा घेत मामाने घरी परत येत तिचा हात धरून “तू खूप छान दिसतेस” असे बोलून तिच्या समोर अश्लील वर्तन केले. घडलेल्या घटनेमुळे अल्पवयीन मुलगी हादरली आणि तिने धैर्य एकवटून शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत भारतीय दंड संहिता कलम ३५४ आणि भारतीय न्याय संहिता कलम ७४ अन्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले असताना आरोपी मामाने दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी शिरूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने सुनावणीदरम्यान आरोपीला अटींसह जामीन मंजूर केला. आरोपीच्या बाजूने ॲडव्होकेट अनिकेत अनिल कुलाळ यांनी काम पाहिले. ही घटना अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी ठरली असून समाजाने अशा घटनांविरुद्ध जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधित कायदेशीर प्रक्रिया वेगाने पुढे नेण्याचे आदेश दिले आहेत.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!