February 21, 2026

मुंबईत मनोज जरांगेंचं भगवं वादळ! वाहतूक ठप्प, सरकारची कोंडी, राज ठाकरेंनी शिंदेंना घेरलं – तर राऊतांचा खळबळजनक आरोप

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मुंबईत थेट फटका बसला. भगव्या वादळामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली, तर आझाद मैदानावरील उपोषणाने सरकारची झोप उडवली. आंदोलकांच्या या लढ्यामुळे केवळ सरकारच अडचणीत आलं नाही, तर मुंबईकरांचेही हाल झाले.

यावरुन राज ठाकरे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तुटून पडले, तर संजय राऊतांनी तर धक्कादायक आरोप करत शिंदेच आंदोलकांना रसद पुरवत असल्याचं म्हटलं.

एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. वाशीत जरांगेंच्या हाती अधिसूचना देत गुलाल उधळणारे शिंदे आज वचनपूर्ती करण्यात अपयशी ठरल्याने तिढा आणखी वाढला आहे. दरम्यान जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसच शिंदेंना काम करू देत नाहीत असा स्फोटक दावा केला.

आता विरोधकांचा प्रश्न सरळ आहे – जरांगेंच्या मागे खरोखरच शिंदे असतील, तर त्यांचा खरा डाव कोणता?

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!