मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईत कूच करण्याची तयारी करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच नव्याने स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज मंत्रालयात दुपारी 2 वाजता पार पडणार आहे.
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न होणार असून, मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी आणि त्यासंबंधी चर्चा येथे होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षण उपसमितीची कामे
- मराठा आरक्षणाविषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचे समन्वय राखणे.
- न्यायालयीन प्रकरणांसाठी नेमलेल्या समुपदेशकांशी समन्वय करणे.
- विशेष समुपदेशकांना सूचना देणे.
- न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे.
- मराठा आंदोलन आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे.
- जातप्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणी सोडवणे.
- मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना व महामंडळांच्या प्रकल्पांचा आढावा घेणे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग
- 27 ऑगस्ट: अंतरवाली – पैठण – शेवगाव (अहिल्यानगर) – कल्याण फाटा – आळे फाटा – शिवनेरी (जुन्नर) मुक्कामी.
- 28 ऑगस्ट: खेड मार्गे चाकण – लोणावळा – वाशी – चेंबूर; रात्री आझाद मैदान पोहचणार.
- 29 ऑगस्ट: सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन सुरु.
ही बैठक आणि आंदोलन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील राजकीय घडामोडी ठरवणार असल्यामुळे सर्वांगीण लक्ष वेधले आहे
