प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या भव्य निवडीची कोरडगावात उत्स्फूर्त आतषबाजी, फटाक्यांची लयलूट व तोफांच्या गडगडाटात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गावात विजयी जल्लोषाचा माहोल तयार झाला होता.सरपंच भोरू मस्के व युवा नेते स्वप्निल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, ग्रामस्थ, तरुणवर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ढोल-ताशांच्या गजरात घुले यांच्यावरील विश्वास व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. गावभर जोरदार घोषणा, शुभेच्छांचा तांडा सुरूच होता.कोरडगाव व परिसरातील सहकारक्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. “ही निवड म्हणजे कोरडगावचा अभिमान,” अशी भावना भोरू म्हस्के यांनी व्यक्त केली.
या जल्लोषात बाबू देशमुख, अशोक देशमुख, लाला मासाळ, संभाजी देशमुख, योगेश मोरे, गुड्डू कांजवणे, समीर बागवान, अशपाक शेख, अभी बडे, आशीर्वाद कचरे, गणेश कचरे, कैलास मासाळ, संतोष कुसळकर, वसीम शेख, कयूम बागवान, बद्री मगर, दिलीप रोकडे, रामेश्वर घुले, शरद घुले, युसुफ टेलर, आसाराम अवसरमर, सोमनाथ कसबे, बाळू रोकडे, संजू कसबे, नारायण आंधळे, आदेश मोरे, स्वप्निल मस्के, गणेश कांजवणे, बबन रावतळे, खलील शेख आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
