February 19, 2026

पाथर्डी | “हे विश्रामगृह आहे की उकिरडा ?” अशा कडक शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहाच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली.

स्वच्छतागृहातील दुर्गंधी आणि परिसरातील अस्वच्छता पाहून ते संतापले. “फोटो-व्हिडिओ काढून पाठवा, बघतो काय करायचे,” असा इशारा देत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले.आज सकाळी साडेसातच्या सुमारास बारामती–दौंड–पाथर्डी मार्गे परतूरकडे जाताना त्यांनी अचानक पाथर्डीच्या विश्रामगृहावर थांबा घेतला. आचारसंहितेमुळे भेट गोपनीय ठेवण्यात आली होती. यावेळी आमदार शिवाजीराव गरजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजीत बेलगे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भागवत, भीमराव फुंदे आणि अ‍ॅड. अंकुश गरजे हे उपस्थित होते.शिस्तप्रिय, वक्तशीर आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांनी दैन्य अवस्थेतील विश्रामगृह पाहताच संताप व्यक्त केला आणि गंभीर कारवाईचा इशारा दिला. आमदार गर्जे यांना दुरुस्ती आणि पुढील कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली.यानंतर बंदद्वार बैठकीत त्यांनी आगामी पालिका निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. “तरुणांना संधी द्या, स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ गावावर भर द्या,” असा संदेश देत त्यांनी उमेदवारांचे मनोबल वाढवले.

संजय भागवत यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीचे थोडक्यात विवेचन केले.उपमुख्यमंत्रींच्या या अचानक भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या दौऱ्यात विरोधी पक्षातील कोणाबरोबरही गोपनीय चर्चा झाली का, याबाबत स्थानिक प्रशासन मौन बाळगत आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!