February 19, 2026

पाथर्डी | शहरातील वनदेवधामणगाव देवी परिसरात बिबट्याचे वावरणे दिसून आले असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री सुमारास दहा वाजता धामणगाव रस्त्यावरील आप्पासाहेब पार्कजवळून वनदेवकडे जाणाऱ्या पायवाटेवर बिबट्या फिरताना काही तरुणांच्या नजरेस आला. त्यांनी तत्काळ परिसरातील लोकांना सतर्क केले.महादेव मंदिर परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते शंकर पालवे यांनीदेखील स्थानिकांना फोन करून सावध राहण्याचे आवाहन केले. मानववस्तीच्या अगदी जवळ बिबट्याचा वावर दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागाने याबाबत परिसरात सूचना फलक लावले आहेत. तसेच मुख्य प्रवेशद्वार सध्या बंद ठेवण्यात आले असून, केवळ पायी चालणाऱ्या ग्रामस्थांनाच वनदेव परिसर आणि बागेमध्ये जाण्याची परवानगी आहे.

नागरिकांना समूहाने फिरणे, निर्जन व डोंगराळ भागात न जाणे, आणि पहाटे व सायंकाळी अंधारात पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन व स्थानिक पोलिसांनी केले आहे.

नागरिकांनी सावध राहावे — हीच विनंती.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!