February 21, 2026

पाथर्डी – राज्य निवडणूक आयोगाच्या नगर पालिका निरीक्षक नयना बोंदार्डे यांनी सोमवारी पाथर्डी नगरपालिकेला भेट देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचा आणि निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.

शहरातील विविध मतदान केंद्रांनाही त्यांनी भेटी देऊन पाहणी केली आणि निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त केले.नगरपालिकेच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना बोंदार्डे यांनी काही उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन केले. उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण आली नसल्याचे सांगितले. निवडणूक प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांनी योग्य सहकार्य दिल्याचेही त्यांनी नमूद केले.या भेटीदरम्यान नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते, सहायक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव नाईक आणि मुख्याधिकारी सपना वासावा उपस्थित होते. बोंदार्डे यांनी अधिकाऱ्यांना निवडणूक काळात कोणतीही अडचण आल्यास त्वरित संपर्क करण्याच्या सूचना दिल्या.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनीही पाथर्डी नगरपालिकेच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती तपासून निवडणूक काळात खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिल्या. या वेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपस्थित होते.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!