February 21, 2026

पाथर्डी तालुक्याच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद यशाची नोंद झाली आहे. श्री तिलोक जैन विद्यालयाचा हुशार विद्यार्थी चि. संयम अनिल खाटेर याने आपल्या बुद्धीच्या आणि एकाग्रतेच्या जोरावर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने राहुरी येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत संयमने १७ वर्षांखालील गटात उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले. त्याच्या उत्कृष्ट खेळीच्या बळावर त्याची आता पुणे येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संयमच्या या यशामुळे श्री तिलोक जैन विद्यालयासह संपूर्ण पाथर्डी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेचे सचिव, विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, तसेच आनंद चेस क्लब पाथर्डी आणि एस. के. चेस क्लासेसचे प्रशिक्षक व खेळाडूंनी संयमचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!