February 20, 2026

समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि दुर्बल घटकांच्या समस्यांना आवाज देत, निर्भीड व सचोटीने पत्रकारिता करणाऱ्या शामली उर्फ शन्नो जाफर पठाण यांना यंदाचा लोकसत्ता संघर्ष निवडपत्राचा “पत्रकाररत्न पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात जिल्ह्यातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभागृहात शन्नो पठाण यांचे नाव जाहीर होताच वातावरण टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. पुरस्कार मुख्यसंपादक मा. श्री. प्रकाश साळवे आणि संपादक मा. श्री. सिद्धीनाथ मेटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी प्रकाश साळवे म्हणाले, “पत्रकारिता ही फक्त वृत्तनिवेदन नाही, तर समाजासाठी जबाबदारी आहे. सत्य मांडणे आज धोकादायक ठरते, तरी शन्नो पठाण यांनी निर्भीडपणे समाजातील वेदना आणि भ्रष्टाचार जगासमोर आणले. त्यांच्या लेखणीमुळे अनेकांना न्याय मिळाला आणि समाजपरिवर्तनाची गती वाढली. त्यांना पत्रकाररत्न पुरस्कार देणे हे संपूर्ण पत्रकारितेसाठी अभिमानाचा क्षण आहे.”

संपादक सिद्धीनाथ मेटे यांनीही गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, “सचोटी, धैर्य आणि समर्पण या तीन मूल्यांचा संगम म्हणजे शन्नो पठाण. त्यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले असून, त्यांची वाटचाल युवक पत्रकारांसाठी दीपस्तंभ आहे.”

पत्रकारितेच्या प्रवासात शन्नो पठाण यांनी नेहमीच निष्पक्ष आणि निर्भीड भूमिका घेतली आहे. सामान्य नागरिकांच्या व्यथा कागदावर उतरवून थांबल्या नाहीत, तर त्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने झगडले. प्रशासनाला जागे केले, भ्रष्टाचारावर प्रहार केला आणि सामाजिक विसंगती समाजासमोर आणून सुधारणा घडवून आणल्या. त्यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून नाही, तर जनतेच्या आवाजाचे प्रखर प्रतीक म्हणून निर्माण झाली आहे.

पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे, युवकांना दिशा देणे, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी उपक्रम राबवणे या कार्यामुळे त्यांनी अनेक क्षेत्रांवर ठसा उमटवला आहे.

शन्नो पठाण यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे की, सचोटी, धैर्य आणि प्रामाणिकतेच्या बळावर पत्रकारिता ही समाजपरिवर्तनाची प्रभावी ताकद ठरू शकते. त्यांच्या लेखणीने निर्माण केलेला विश्वास हा केवळ वाचकांसाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी आहे. त्यामुळे मिळालेला “पत्रकाररत्न पुरस्कार २०२५” हा त्यांचा व्यक्तिगत गौरव नसून, संपूर्ण पत्रकारितेच्या मूल्यांचा व समाजातील संघर्षशील वृत्तीचा सन्मान आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!