February 19, 2026

शेवगाव शहर आणि तालुक्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वर “किंग अजय सावता” या व्यक्तीने महापुरुष आणि मातंग समाजाबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्द वापरल्याने संतापाची लाट उसळली आहे. समाजाच्या आत्मसन्मानावर घाला घालणाऱ्या या कृत्याचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येत असून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

समाजाच्या प्रतिष्ठेवर आघात करणाऱ्या या घटनेविरोधात कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर केले असून आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (अॅट्रॉसिटी अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास समाज रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करेल, याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.

कार्यकर्त्यांनी सांगितले की, समाजातील ऐक्य आणि स्वाभिमान जपण्यासाठी अशा द्वेषपूर्ण कृत्यांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही प्रकारे समाजाच्या भावना दुखावणाऱ्या कृती सहन केल्या जाणार नाहीत. समाजाच्या आत्मसन्मानासाठी आणि एकजुटीसाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनात पुढील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल सरोदे, विठ्ठल मोहिते, प्रकाश तुजारे, किरण शिरसाट, प्रवीण भारस्कर, प्रदीप मोहिते, सचिन सरोदे, योव्हान रोकडे, रामेश्वर तुजारे, अभिजीत हाबड, सुनील मोहिते, सुनील सरोदे, कैलास भारस्कर, भारत सरोदे, किरण शिरसाट, विश्वास मोहिते, चैतन्य लांडे, तुखेमार, इरफान शेख, तुषार लांडे, आकाश काते, सतिष शिरसाट आदी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

समाजाच्या भावना आणि स्वाभिमान दुखावणाऱ्या कोणत्याही कृतीला ठाम विरोध केला जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला असून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोरकसपणे करण्यात आली आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!