February 21, 2026

पाथर्डी : दिवाळीच्या सणात प्रत्येक घरात आनंदाचा प्रकाश पोहोचावा या हेतूने शंकर बाबा मठातर्फे दलित वस्तीत ५१ वंचित कुटुंबांना कपडे, फराळ व प्रसाद वाटप करण्यात आले.

मठाचे मठाधिपती माधव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाने सामाजिक समतेचा सुंदर संदेश दिला.भाविकांकडून मठासाठी आलेल्या देणगीतून हा कार्यक्रम राबवण्यात आला. वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित कुटुंबांना सणाच्या उत्साहात सामावून घेण्याचा प्रयत्न करत “जात-धर्माच्या भिंती तोडून सर्वांना सणाच्या आनंदात सामावून घेणे हेच खरी समाजसेवा आहे,” असे माधव बाबा म्हणाले.

या उपक्रमामुळे दलित वस्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी “माधव बाबांच्या रूपाने आम्हाला शंकर महाराज भेटल्यासारखे वाटले,” अशा भावना व्यक्त केल्या. मानवतेचा खरा दीपोत्सव ठरलेल्या या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!