February 19, 2026

प्रतिनिधी – सचिन दिनकर

पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी करताना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पूरग्रस्तांना धीर दिला.

जालन्यावरून बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्याकडे जाताना त्यांनी मालेवाडी आणि खरवंडी कासार येथे थांबून पुरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्यासह चर्चेतून पूरग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले.

या पाहणीदरम्यान आमदार मोनिका राजळे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, राहुल कारखेले, अमोल गरजे, माणिक खेडकर, अशोक खरमाटे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावोगावच्या ग्रामस्थांनी आणि महिलांनी मुंडे यांना निवेदन देत भरीव मदत व पुनर्वसनाची मागणी केली.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!