नुकताच पंचायतराज मंत्रालय भारत सरकारच्या वतीने शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण कार्यक्रमात पंचायत विकास निर्देशांक व राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सन २०२२-२३ आधारित जिल्हास्तर जलसमृद्ध गाव प्रथम पुरस्कार हिवरेबाजारला मिळाला.

राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. याप्रसंगी विधानपरिषदेचे अध्यक्ष मा.ना.रामजी शिंदे, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटरावजी पवार, आमदार श्री.काशिनाथजी दाते, आमदार श्री. विठ्ठलरावजी लंघे, आमदार श्री. विक्रमजी पाचपुते, यशदा चे उपमहासंचालक श्री. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंदजी भंडारी, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजयजी मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हिवरे बाजार गावाने पाण्याच्या ताळेबंदावर आधारित पिक पद्धतीचा अवलंब तसेच गुणवत्तापूर्ण जलसंधारण कामामुळे हा पुरस्कार मिळाला असून पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे होते.
पुरस्कार स्वीकारताना हिवरे बाजारचे सरपंच विमलताई ठाणगे,चेअरमन छबुराव ठाणगे,व्हा चेअरमन रामभाऊ चत्तर,एस.टी.पादीर, मुंबादेवी दुधडेअरी चेअरमन बाबासाहेब गुंजाळ,सहदेव पवार,राजू सहादू ठाणगे,राजू पवार,श्रीपत फलके ग्रामविकास अधिकारी, गुलाब गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
