February 20, 2026

पाथर्डी │ श्री तिलोक जैन विद्यालयाने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रीन क्लब (श्री तिलोक जैन विद्यालय व आनंद महाविद्यालय) अंतर्गत शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवले.

सुमारे १५५ विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीच्या मूर्ती तयार करून नैसर्गिक रंगांनी सजवल्या व आपल्या घरी पर्यावरणपूरक पद्धतीने प्रतिष्ठापित करण्याचा संकल्प केला. यावेळी प्लास्टिकमुक्त सजावट करण्यावरही भर देण्यात आला.

गणेश विसर्जनावेळी पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य व मूर्ती स्वतंत्रपणे गोळा करून योग्य व्यवस्थापन करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केला आहे.

विद्यालयाचे प्राचार्य अजय भंडारी यांनी शालेय गणेशमूर्ती देखील शाडू मातीचीच तयार करून पर्यावरणपूरक सजावटीसह स्थापना केली. “उपदेशापुरते नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून द्यायचे,” हा संदेश विद्यालयाने दिला.

या उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव सतीश गुगळे तसेच पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य व शिक्षकांचे अभिनंदन केले. समाजातून विद्यालयाच्या या नव्या आणि उपयुक्त उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!