February 18, 2026
OIP (3)

मुंबई – दहीहंडी उत्सव म्हटला की जय जवान गोविंदा पथकाचे नाव अवर्जून घेतले जाते. यंदाही या प्रतिष्ठित पथकाने आपल्या थरारक प्रदर्शनाने उत्सवात धुरळा उडवला. पथकाने तीन वेळा तब्बल 10 थर रचून विक्रम प्रस्थापित केला आणि उपस्थितांना थक्क केले. मुंबईतील दहीहंडी उत्सवात या पथकाचे मानाचे स्थान असून, प्रत्येक वर्षी ते थररवाडा सादरीकरणासाठी ओळखले जाते.

जय जवान गोविंद्यांच्या यशस्वी कामगिरीमुळे आता त्यांना जागतिक पटलावर आपली कला दाखवण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घोषणेनुसार, ऑक्टोबर 2026 मध्ये जय जवान पथक स्पेनमध्ये होणाऱ्या कॅसलर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. 41 सदस्यीय ही टीम भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, भारतीय दहीहंडी परंपरेची छाप जगभर उमटवेल.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणारा संपूर्ण खर्च मनसेकडून केला जाणार आहे. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अविनाश जाधव यांनी या निर्णयाला अधिकृत रूप दिले. प्रवास, निवास आणि स्पर्धेसाठी लागणारे सर्व खर्च सेनेकडून उचलले जाणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

जय जवान गोविंदा पथक केवळ मुंबईतच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आता परिचित होणार आहे. त्यांच्या मेहनतीचे जागतिक स्तरावर रूपांतर होणार असून, दहीहंडी उत्सवाची शान आता थेट स्पेनमध्ये पोहोचणार आहे.

मुंबईतील दहीहंडी उत्सवात 10 थरांच्या विक्रमामुळे जय जवान पथकाच्या कार्याची सर्वत्र चर्चा आहे. पथकाच्या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली असून, भारतीय गोविंदा परंपरेला जागतिक मान्यता मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!