प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी – येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने आणखी एक मानाचा तुरा मिरवला असून तब्बल ३१ विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यदलाच्या अग्निवीर भरतीत उत्तुंग यश संपादन केले.

कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर केलेल्या शारीरिक तयारीमुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार झाली. आर्थिकदृष्ट्या साधारण परिस्थिती असूनही जिद्द, चिकाटी आणि ध्येयवेडेपणाने त्यांनी सैन्यदलात स्थान मिळवले.
यावर्षी भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत महाराष्ट्रातील एका महाविद्यालयातून इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची निवड होणे हा राज्यस्तरीय उच्चांक ठरला आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या दूरदृष्टीतून मा. आमदार स्व. बाबुजी आव्हाड यांनी स्थापन केलेले हे महाविद्यालय आज ‘गावातले विद्यापीठ’ ठरत असल्याचे चित्र आहे.
गत १४ वर्षांत महाविद्यालयाच्या ग्रंथालय, करिअर कट्टा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, भव्य क्रीडांगण व आधुनिक सोयीसुविधांच्
सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे म्हणाले,
“सैन्यदलात भरती व्हायचे असेल तर पूर्ण क्षमतेने अभ्यास व सराव करणे अत्यावश्यक आहे. अडचणींना न घाबरता प्रामाणिक प्रयत्न केले तर यश शाश्वत असते. ग्रामीण विद्यार्थीदेखील योग्य नियोजनाने स्पर्धा परीक्षेत उजवे ठरू शकतात. महाविद्यालयाने यावर्षीही आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे.”
पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून करिअर कट्टा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, समृद्ध ग्रंथालय, तज्ञ प्राध्यापक, ४०० मीटर धावपट्टी, इनडोअर स्टेडियम, भव्य क्रीडांगण यांसारख्या सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्यात येतात. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन उभा केलेला हा अभ्यासमॉडेल विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.
या यशस्वी कार्यात करिअर कट्टा व स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. किरण गुलदगड, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख, एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किरण गुलदगड यांनी, सूत्रसंचालन प्रा. शरद बोडखे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन पालवे यांनी केले.
