February 19, 2026

पाथर्डी – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि गल्लीबोळ गर्दीने फुलून गेले आहेत. खरेदीचा हंगाम आणि सुट्ट्यांमुळे वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि सणाच्या उत्साहात कोणत्याही प्रकारचा अनुशासनभंग होऊ नये, यासाठी पाथर्डी पोलिसांनी शहरात धडक मोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान, काल सायंकाळीच पोलिसांनी विविध नियमभंग करणाऱ्या सुमारे १२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कठोर हालचालीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनुशासनभंग करणाऱ्या आणि मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या घटकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर, तसेच पोलीस कर्मचारी अमोल आव्हाड, निलेश गुंड, मधुकर कोकाटे, अल्ताफ शेख, विजय काळोखे, शिवाजी नागरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!