February 19, 2026

बीड शहरातील माने कॉम्पलेक्स परिसरात शुक्रवार (दि. १७) रोजी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मिनीगंठन दुचाकीस्वार चोरट्यांनी क्षणार्धात हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा अरुण जगताप (वय ५४, रा. शाहूनगर, बीड) या शुक्रवारी सायंकाळी आपल्या नातवंडांसोबत माने कॉम्पलेक्स परिसरातील उद्यानाकडे फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, समोरून आलेल्या दुचाकीवरील अज्ञात दोघा तरुणांनी झडप घालत त्यांच्या गळ्यातील सुमारे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठन जबरदस्तीने हिसकावून नेले आणि दुचाकीवरून पलायन केले.

या घटनेत सुमारे ₹७५,००० किमतीचा ऐवज लंपास झाला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेनंतर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, महिलांनी सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान दागिने न घालण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!