February 21, 2026

पाथर्डी – शहरातील मतिमंद मुलांचे बालगृह आणि निवासी मतिमंद विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि मेहनतीचा सुंदर परिचय देत या वर्षीची दिवाळी खऱ्या अर्थाने उजळवली आहे.

त्यांच्या छोट्या हातांनी साकारलेली आकाशकंदील, पणत्या, लक्ष्मीमूर्ती आणि सजावटी साहित्याची ही मनमोहक प्रदर्शनी केवळ कलाकृती नसून आत्मविश्वास, श्रम आणि आनंदाचा उत्सव ठरली आहे.या प्रेरणादायी उपक्रमाला पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “या दिव्यांग बालकांनी घडवलेली प्रत्येक वस्तू ही त्यांच्या जिद्दीची कहाणी आहे. त्यांची कला खरेदी करणे म्हणजे त्यांना उज्ज्वल भविष्याचा दीप देणे होय.”

बालगृहात तयार झालेल्या वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पाथर्डी नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका मंगलताई कोकाटे आणि बबनराव बुचकुले यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. बालकांच्या चेहऱ्यावर आनंद, तर उपस्थित नागरिकांच्या नजरेत अभिमान आणि आपुलकी दिसत होती. या प्रसंगी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या बालकांच्या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत लोखंडे यांनी केले, सूत्रसंचालन गौतम बळीद यांनी तर आभार प्रदर्शन नितेश मेघनर यांनी केले.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!