February 21, 2026

प्रतिनिधी – सचिन दिनकर

पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरकडून शेवगावकडे पाच नवेकोरे ट्रॅक्टर घेऊन जात असलेल्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने करंजी घाटातील माणिकशहा बाबा जवळील धोकादायक वळणावर हा कंटेनर समोरील खोलदरीत जाऊन कोसळला.

या अपघातामध्ये कंटेनरसह सहा नव्या कोऱ्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी राज्य मार्ग पोलीस विभागाच्या पथकाने नगरला पाठवले आहे. घाटातील धोकादायक वळणाजवळ घडलेल्या या अपघातामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र राज्य मार्ग पोलीस विभागाने तत्परता दाखवत काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. करंजी घाटात नवेकोरे ट्रॅक्टर दरीत पडल्याची माहिती समजताच प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. करंजी घाटातील याच धोकादायक वळणावर सातत्याने लहान-मोठे अपघात घडत असून या वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार प्रवाशांकडून होत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!