सावधगिरीच्या मुख्य सूचना :

🌩 मेघगर्जना / विजांचा कडकडाट:
- झाडाखाली किंवा उघड्यावर उभे राहू नये
- सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या
- विद्युत उपकरणांचा वापर टाळा
💨 वादळी वारे / रस्ते:
- ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटारसायकल/सायकलपासून दूर राहावे
- मोकळ्या मैदानात, टॉवर, विद्युत खांब, धातूचे कुंपणजवळ थांबू नये
- लोंबकळणाऱ्या केबल्सपासून अंतर ठेवा
- जाहिरात फलकांजवळ थांबणे टाळा
🪁 सुरक्षितता मोकळ्या जागेत:
- गुडघ्यावर बसून कान झाका, डोके गुडघ्यांमध्ये ठेवा
- जमीनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा
- धरण / नदीच्या प्रवाहात उतरू नये
- धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये
🌊 नदी / ओढे / नाले:
- पाणी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करा
- पूल / बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्यास ओलांडू नये
🏠 घर / इमारती:
- जुनाट / मोडकळीस आलेल्या इमारतीत आश्रय घेऊ नये
- डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी भूस्खलन / दरडी कोसळण्याचा धोका लक्षात ठेवावा
🐾 जनावर:
- सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे
📞 आपत्कालीन संपर्क:
- जिल्हा नियंत्रण कक्ष टोल-फ्री: १०७७
- दूरध्वनी: ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०
💡 जनतेचा आवाज
सुरक्षित राहा, सतर्क राहा, आणि वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतर करा !
