प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी – शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य शाखा, पाथर्डी तालुका नवी कार्यकारिणी निवड सभेत दैनिक नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी पत्रकार संदीप शेवाळे यांची पाथर्डी तालुका शाखेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांच्या हस्ते संदीप शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, कार्यकारिणी सदस्य रवींद्र उर्फ बंडूशेठ दानापुरे, प्राचार्य सुरेश मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून परिषदेच्या कार्याची अधिक प्रभावीपणे माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शेवाळे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
