बीड _जवळील रामगड परिसरात आज सकाळी तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, दोन दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांनी इमामपूर रोड परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सलग दोन दिवसांत वडील आणि मुलगी दोघांचेही मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.
मृत व्यक्तीचे नाव जयराम बोराडे असे असून, त्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा शोध सुरू होता. स्थानिकांच्या माहितीनुसार, जयराम बोराडे हे मुलीसह घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला, मात्र चिमुरडी बेपत्ता होती. दोन दिवसांच्या शोधानंतर आज रामगड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही तरुणांना लिंबाच्या झाडाला मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा सखोल तपास बीड ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
या हृदयद्रावक घटनेने बीडमध्ये शोककळा पसरली असून, वडील आणि मुलगी दोघांच्याही मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले
