महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासन सतत प्रयत्न करत असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे.

योजनेचा पहिला हप्ता जुलै 2024 मध्ये मिळाल्यानंतर आतापर्यंत एकूण १३ हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
