February 20, 2026

पाथर्डी_तालुक्यातील निवडुंगे येथील ग्रामपंचायतकडे मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शासनाकडून मिळालेला १५ टक्के निधी अनेक दिवसांपासून खर्च न होता शिल्लक आहे.

या निधीच्या अभावी समाजातील गरजू लोक विकासकामांपासून वंचित राहात आहेत, अशी खंत व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते आकाश इंद्रजित शिंदे यांनी तात्काळ निधी खर्च करण्याची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीकडे असलेला हा निधी समाजाच्या कल्याणासाठी वापरला नाही, तर तो पुन्हा शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजाचा हक्क मिळावा, यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक कार्यकर्ते सुभाष शिंदे, राहुल शिंदे, अनिल शिंदे, भीमराज शिंदे, मार्कस शिंदे आणि विशाल ठोकळ यांनी दिला आहे.

आता सर्वांचे लक्ष ग्रामपंचायतीच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे – हा निधी समाजाच्या विकासासाठी वापरला जाईल का? की आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल ? वेळ सांगेल !

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!