February 19, 2026

पाथर्डी (जि. अहिल्यानगर) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रुग्णांना व गरजूंना फळांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय विभागाने रुग्णांना वेळेवर उपचार व आवश्यक ती मदत पुरवावी, असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले.

या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष नासिर शहानवाज शेख यांनी सपकाळ साहेबांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, “ते राज्यात सामाजिक समरसता आणि जातीय सलोखा टिकवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकीचा व शांततेचा विचार पोहोचवणे, सामाजिक विषमता दूर करणे या त्यांच्या वाटचालीत प्रामुख्याने दिसून येते. आज देशात वाढते आर्थिक अस्थैर्य, सामाजिक तणाव, बेरोजगारी व भाववाढ यामुळे जनतेची अवस्था गंभीर झाली आहे. या संकटातून देशाला बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त काँग्रेसकडेच आहे.”

ते पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य दर, गरिबांना न्याय आणि समाजात ऐक्य टिकवण्यासाठी काँग्रेस संघर्षरत आहे. सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कार्यकर्ता अथकपणे लढत आहे. त्यांच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची आम्ही प्रार्थना करतो.”

या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरवसे, तालुका काँग्रेस सेवा दल अध्यक्ष किशोर डांगे, अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष गणेश दिनकर, जिल्हा प्रतिनिधी नवाब शेख, अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष असलम सय्यद, तालुका उपाध्यक्ष पापाभाई तांबोळी, प्रवीण भाऊ राजगुरू, मुन्ना खलिफा, जब्बारभाई आतार, सुरेश बोरुडे, दादूभाऊ बर्डे, सागर दराडे, सादिक सय्यद, जियान शेख, केदार अंबादास, तसेच रुग्णालयातील कर्मचारी भाऊसाहेब शिंदे, आयुब शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!