जिल्हाधिकारी यांची वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाकडून भेट

अहिल्यानगर – वडुले (ता. नेवासा) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे 17 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. मृत्युपूर्वी केलेल्या व्हिडिओत त्याने राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारला या आत्महत्येस जबाबदार धरले होते. मात्र, घटनेला पंधराहून अधिक दिवस उलटून गेले तरी कुटुंबाला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. ही मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यासोबतच शासनाने 1 ऑगस्ट रोजी घेतलेल्या निर्णयानुसार शासकीय गावठाण आणि गायरान जागेवरील निवासासाठीची अतिक्रमणे कायम करण्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्याने तो निर्णय तातडीने राबवावा, अशीही मागणी करण्यात आली.

ही भेट वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष योगेश साठे, युवा जिल्हाध्यक्ष योगेश गुंजाळ, नेवासा तालुका अध्यक्ष पोपट सरोदे, प्रसाद भिवंसने, प्रवीण ओरे, अमर निर्भवणे, राजीव भिंगारदिवे, जेवण डी. सिरसाठ, बाबासाहेब आल्हाट, फिरोज पठाण, संकेत शिंदे, अजित कुऱ्हाडे, अविनाश ठोंबरे, प्रसाद कांबळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेचा आवाज
“आवाज तुमचा, व्यासपीठ आमचे”
👉 आजच आमच्याशी जुडले ज,
तुमच्यासाठी सत्य, पारदर्शक आणि निर्भीड पत्रकारिता!
👤 संपादक : सचिन दिनकर
👤 उपसंपादक : सतीश मिरपगार
📞 संपर्क : 8605 255 255 / 94 21 55 55 67
