February 21, 2026

प्रतिनिधी सचिन दिनकर

पाथर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ चे मतदान शनिवार, २० डिसेंबर रोजी होत आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षसह १० प्रभागातील २० जागांसाठी उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा दमदार पाठिंबा मिळणार आहे!गुरुवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वीर सावरकर मैदान, भाजी बाजारतळ येथे भव्य जाहीर सभा!यावेळी जलसंपदा मंत्री व पालकमंत्री ना. राधाकृष्णजी विखे पाटीलांसह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पाथर्डी शहरातील मतदार बंधू-भगिनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.

या सभेला येऊन भाजप उमेदवारांना विजयी करा !

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!