February 19, 2026

पाथर्डी – पोलिस ठाण्याच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून परिसरात कचर्‍याचा वास जाणवतो आहे. डुकरे ठाण्याच्या आवारात येवून अधिक घाण करत आहेत, तर झाडांवर पडलेली फुले खाण्यासाठी गाई आणि वासरे येत आहेत. दत्त मंदीरासमोर मुकी जनावरे शेण टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांनी ठिकाणावरील मोटारसायकली अस्ताव्यस्त लावल्यामुळे ठाण्याच्या आवारात अडथळा निर्माण झाला आहे. एकेकाळी स्वच्छ व सुंदर असलेल्या पाथर्डी पोलिस ठाण्याला आता अवकळा आलेली दिसते.ठाण्याची इमारत अतिशय सुंदर असूनही परिसरातील घाणीचे प्रमाण वाढल्याने पोलिस ठाण्याचे सौंदर्य अधोरेखित होत नाही.

सध्या ठाण्यात नेमके काय सुरू आहे हे समजणे कठीण आहे.

गेल्या आठवड्यात एका प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी चांगलीच समज दिल्याचे समजते. चोरी झालेल्या व्यक्तीच्या सोन्याच्या चैन चोरीसंदर्भातील गुन्ह्यात काही आर्थिक गैरप्रकार झाल्याची चर्चा रंगली होती. संबंधितांनी लोकप्रतिनिधींना संपर्क साधल्यावर पोलिस अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली असल्याचे सांगितले जाते. मल्लीनाथी पोलिस अधिकाऱ्यांनी “तो चोर असला तरी त्याची चैन चोरण्याचा अधिकार कोणालाही नाही” असे स्पष्ट केले आहे.

ही परिस्थिती पाहून नागरीकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, “उद्धवा, अजब तुझे सरकार” असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!