February 21, 2026

पाथर्डी । श्री संत गोबी कला क्रीडा प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त आयोजित गवळण मैफिलीने रसिक प्रेक्षकांना सुरेल मेजवानी दिली. या कार्यक्रमात विविध भावगीत, भक्तिगीत आणि दिवाळी विशेष गाणी सादर करण्यात आली.

या प्रसंगी पाथर्डी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, मा. प्राचार्य जी. पी. ढाकणे,अल्ताफ शेख,अक्षय वायकर आदी मान्यवर उपस्थित होते. मैफिलीची सुरुवात “ओमकार स्वरूपा” या भावगीताने झाली. त्यानंतर “सूर निरागस हो”*, *“आली माझ्या घरी ही दिवाळी”*, *“रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना”*, *“ऐरणीच्या देवा तुला”* अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करण्यात आली. **विवेक बडे** यांच्या पहाडी आवाजात सादर केलेल्या *“गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू यावे”* या गीताने प्रेक्षकांत जल्लोष निर्माण झाला, तर **संग्राम शेवाळे** यांच्या *“भेटला विठ्ठला माझा”* या भक्तिगीताने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाला **बाबासाहेब जायभाय** व **सोमनाथ घोरपडे** यांनी हार्मोनियमची, तर **यश घोरपडे** व **राजेंद्र चव्हाण** यांनी तबल्याची साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत **मयूर बोडखे** यांनी केले. सूत्रसंचालन **शैलेश शिंदे** यांनी तर आभार प्रदर्शन **सुरेखा बोडखे** यांनी केले. या मैफिलीत **विवेक बडे, संग्राम शेवाळे, प्रज्ञा घुले, पुनम सानप, प्रीतम घुगे, श्री. घुगे** आदी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांना सुरेल क्षणांचा अनुभव दिला.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!