February 21, 2026

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने २०१९ साली सुरू केलेली ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधारस्तंभ ठरली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या स्वरूपात दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे एकूण वीस हप्ते देशातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तथापि, काही राज्यांतील शेतकऱ्यांना २१ हप्त्यांचा लाभ मिळाल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या पूरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मात्र, इतर राज्यांतील शेतकऱ्यांना अजून हा हप्ता मिळालेला नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. २ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर शेतकरी वर्ग दिवाळीपूर्वीच पुढील हप्त्याची अपेक्षा करत होता. मात्र आता हा हप्ता लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सरकारकडून अद्याप पुढील तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कृषी खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची व आधार लिंकिंगची प्रक्रिया प्रलंबित असल्याने निधी वितरणात विलंब होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता देशभर वितरित केला जाईल, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, दिवाळीचा सण जवळ आला असून ग्रामीण भागात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने हा हप्ता वितरित करण्याची मागणी केली आहे. कारण शेतीसाठी लागणारे इनपुट खर्च, खत, बियाणे तसेच कुटुंबाचा सणासुदीचा खर्च या सर्वांसाठी या निधीची शेतकऱ्यांना मोठी गरज भासत आहे. शेतकऱ्यांच्या आशा आता केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत. दिवाळीनंतर या योजनेचा २१ वा हप्ता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, लाखो शेतकऱ्यांच्या नजरा पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर खिळल्या आहेत.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!