February 18, 2026

संपादक : सचिन दिनकर , उपसंपादक : सतिश मिरपगार

मोहटादेवी गडावर नवरात्र उत्सवा निमित्त सातव्या माळेसाठी हजारो भाविक भक्त पायी प्रवास करीत असतात. या भाविक भक्तांची सेवा करण्यासाठी संत वामनभाऊ तरुण मंडळाच्या वतीने फराळ वाटप, केळी आणि नायलॉन चिवडा वाटपाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आई जगदंब मोहटादेवी माता व राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर नारळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी लोकप्रिय खासदार लोकनेते निलेश लंके यांच्या हस्ते फराळ वाटपाचा शुभारंभ झाला.

यावेळी मंडळाचे मार्गदर्शक प्रसिद्ध व्यापारी सुरेश चौरडियाबबन आण्णा गायकवाड यांनी खासदार निलेश लंके यांचा मेडल व शाल देऊन सन्मान केला.या कार्यक्रमाला नगरसेवक योगीराज गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, तसेच पुणे-चाकण येथील निगोजे गावचे लोकनियुक्त सरपंच युवराज शिंदे, दिपक गायकवाड, दिलीप गायकवाड, बबलू वावरे, सुमित तरवडे, बाळासाहेब ढाकणे, सुरेश कुलथे, सतिष एडके, मंगेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष सचिन नागापुरे यांच्यासह गणेश खाडे, पियुष गायकवाड, सुभाष भागवत, आशिष शर्मा, वरद भालेराव, डॉ. हर्षल बारगजे, वैभव गायकवाड, ऋषीकेश गायकवाड, भूषण नागापुरे, यश जेधे, कृष्णा जेधे यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी विशेष योगदान सुरेश चौरडिया, सचिन गायकवाड, अमोल गर्जे, नंदकुमार डाळिंबकर, सुभाष भागवत, आजिनाथ दौड, तुषार देखणे, विशाल रोकडे यांचे लाभले. आचारी म्हणून आशिष शर्मा यांनी जबाबदारी सांभाळली.

मंडळाचे अध्यक्ष सचिन नागापुरे यांनी सांगितले की, वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात फराळ वाटप, रक्तदान शिबीर, गोर-गरिबांना कपडे वाटप, राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गड-किल्ले मोहिम, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भागवत सर यांनी केले. प्रास्ताविक भूषण नागापुरे यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!