February 19, 2026

प्रतिनिधी – सचिन दिनकर

पाथर्डी_सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे तिसगाव येथे अनेक मोठमोठे झाडे पडली असून सलाबतखान मज्जित जवळील एका वडाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या चार चाकी वाहनावर झाडाची फांदी पडली.

फांदी तुटल्याने घरामध्ये घेतलेल्या वीज कनेक्शनची सर्विस वायर देखील या फांदीमुळे तुटली मंगळवारी गाडीवर पडलेली फांदी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शैनाज उर्फ ( बुऱ्हि खाला) सिकंदर बेग यांना सर्विसवायरमधून आलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक बसल्याने बेग यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या तिसगाव ग्रामस्थांनी महावितरणला जबाबदार धरत वृद्धेश्वर चौकात रस्तारोको आंदोलन सुरू केले व महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!