पाथर्डी मा. मंत्री ना. श्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथर्डी येथे प्रवेश दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच माजी प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माताप्रतीमेला पूजन करून झाली. त्यानंतर संस्थेचे स्थानिक प्रभारी प्राचार्य श्री लोखंडचूर सर यांनी संस्थेचा इतिहास, कार्यप्रणाली व उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन केले.
🔹 विविध विषयांवरील मार्गदर्शन
- संस्थेतील व्यवसाय व अभ्यासक्रम : श्री लोखंडचूर सर
- कार्यप्रणाली व प्रशिक्षण प्रक्रिया : श्री गोराणे सर
- शिस्त व कार्यालयीन कामकाज : श्रीमती बडे मॅडम
- भौतिक सुविधा व इमारत व्यवस्था : श्री मांजरे सर
- सांस्कृतिक उपक्रम, ओळख व सुसंवाद : श्री सुपेकर सर
नवीन प्रशिक्षणार्थी व पालकांचे संस्थेमध्ये गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी काही पालकांनी मनोगत व्यक्त करून संस्थेविषयी समाधान व अभिमान व्यक्त केला.
🔹 प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
श्री सुपेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून प्रशिक्षणार्थींनी स्वतःचा व्यवसाय उभारावा तसेच समाजातील उपेक्षित घटकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.”
🔹 कार्यक्रमाचे नियोजन व संचालन
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक प्रभारी प्राचार्य श्री लोखंडचूर सर यांनी भूषविले. सूत्रसंचालन श्री सुपेकर सर यांनी केले. अनुमोदन गोराणे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री पठाण सर यांनी मानले.
या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व निदेशक, कार्यालयीन कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.प्रवेश दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमामुळे नव्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संस्थेच्या उज्ज्वल परंपरेला नवा आयाम मिळाला आहे.
